ओतूर येथे शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण.

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतुर येथे मंगळवार दिनांक १५/८/२०२३ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. प्रथमता महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ओतुर गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डुंबरे यांच्या शुभहस्ते ध्वजा रोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे, उपाध्यक्ष श्रीहरी तांबे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी यु खरात सर्व विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे बाळासाहेब डुंबरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.त्यानंतर वृक्षारोपणावेळी प्रमुख पाहुणे बाळासाहेब डुंबरे, महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु. खरात संगणक विभागप्रमुख डॉ सुनील खताळ मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. सचिन जाधव, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक मुनिकेशन विभागप्रमुख डॉ सुनीलकुमार तसेच कार्यालय अधीक्षक विशाल बेनके महाविद्यालय विकास मंडळ अधिकारी डॉ. मोनिका रोकडे, ग्रंथपाल शामराव बढे, प्रथम वर्ष समन्वयक प्रा सिद्धार्थ पानसरे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विविध प्रजातीची वृक्षांची लागवड विद्यार्थ्यांच्या समवेत करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने नारळ, चिंच, आंबा, पेरु, आवळा, बदाम, जांभुळ अशा विविध वृक्षांची लागवड केली गेली त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे बाळासाहेब डुंबरे यांनी त्या वृक्षांची जोपासना करून ते वृक्ष कशा पद्धतीने मोठी करावी याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु. खरात यांनी विविध वृक्षांचे उपयोग आणि पर्यावरणामध्ये असलेले त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these

X