शिक्षणमहर्षी कै. विलास तांबे यांनी उभारलेली शैक्षणिक संकुले प्रेरणादायी

शिक्षणमहर्षी कै . विलास तांबे यांच्या त्यागातून जिल्ह्यात उभी राहिलेली शैक्षणिक संकुले आमच्यासाठी प्रेरणादायी असून येथे गरीब व होतकरू मुले शिक्षण घेतात, त्यांची सर्वांसाठी मोठी आठवण आहे, असे प्रतिपादन पुण्याचे नगरसेवक व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी केले.

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास तांबे यांच्या नवव्या पुण्यस्मरणदिनी ओतूर (ता . जुन्नर) येथे आयोजित कार्यक्रमात विशाल तांबे बोलत होते. या वेळी व्याख्याते गणेश आत्माराम शिंदे , जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, ‘विघ्नहर’च्या संचालक नीलम तांबे, धनंजय डुंबरे, मंडळाचे सचिव वैभव तांबे, सुभाष विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमण काकडे, बाजार समिती संचालक संतोष तांबे, शिवसेना जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, गंगाराम डुंबरे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, मंगल ढमाले, डॉ. किरण शिंदे, मयूर ढमाले, जयप्रकाश डुंबरे, ऋषी डुंबरे, विश्वास डुंबरे, डी. बी. दाते, मालती डुंबरे, तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.

गणेश शिंदे यांनी श्री गजानन महाराज व विलास तांबे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. जीवन सुंदर आहे, या विषयावर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पोपट घनवट यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे यांनी आभार मानले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these

X