शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनी पद्मश्री हिरवे भारतात पाचवी

GPAT परीक्षेचा निकाल जाहीर !

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिटूड टेस्टच्या परीक्षेचा निकाल रविवारी ( दि . २ ) जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये श्री गजानन महाराज प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनी पदमश्री हिरवे हिने उतुंग असे यश संपादन करत संपूर्ण भारतातून पाचवी येण्याचा मान पटकावला आहे. महाविद्यालयातील १. कु. पद्मश्री हिरवे संपूर्ण भारतात ५ वी ( ९९.९९ NTA स्कोर) २. कु. समीक्षा बेनके संपूर्ण भारतात १९७८(९६.८३ NTA स्कोर) ३. कु. नम्रता घोलप संपूर्ण भारतात २०१७ ( ९६.७७ NTA स्कोर) ४. कु. मयुरी हेमाड संपूर्ण भारतात १५७५ ( ९७.४९ NTA स्कोर)
या विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी स्वर्गीय विलास तांबे यांचे स्वप्न होते कि मुलींनी शिक्षणात प्रगती करावी. सुशिक्षित मुलगी हि समाजासाठी वरदान असते. आणि त्यासाठीच त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी अविरत प्रयत्न केले. ते स्वप्न आज खरोखरच झाले आहे.

यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी “शिक्षण हे अथांग आहे, जितके तुम्ही प्राप्त करत जाल तितकेच तुम्हाला साध्य करायचे आहे. “आणि सेक्रेटरी वैभव तांबे यांनी “प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन अभ्यास करणारेच जीवनामध्ये यशस्वी होतात” अश्या शब्दांमध्ये विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना अश्या प्रकारचे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश दामा नेहमीच परावृत करत असतात. “उच्च ध्येय डोळ्यापुढे ठेऊन शिक्षण घेणारा विद्यार्थीच उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन प्रगत देशाशी बरोबरी करण्यासाठी योगदान देऊ शकतो. “हा विचार समोर धरून विद्यार्थ्यांना परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन,सोयी सुविधा तसेच विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी लागणारी संसाधने, पुस्तकालय, वाचनालय व शिक्षण पुरवण्याकडे डॉ. गणेश दामा यांचे विशेष लक्ष असते आणि त्याचाच परिणाम म्हणून शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालयातील इतिहासाच्या सुवर्ण अध्यायात पदमश्री हिरवे हिने नाव कोरत भारतातून पाचवी येण्याचा मान मिळविला आहे. डॉ. गणेश दामा यांनी यशस्वी विद्यार्थनींचे अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव यापुढेही असे यश शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालय मिळवत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. सदर परीक्षा संपूर्ण भारतात २२ मे २०२३ रोजी घेण्यात आली होती. संपूर्ण भारतातून तब्बल ६८,४३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातून ६२,२७५ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते. भारतात एकूण २२१ केंद्रात हि परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यामधून या विद्यार्थिनींनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. आपल्या यशामध्ये आई-वडील, डॉ. गणेश दामा आणि महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे असे पदमश्री हिरवे आणि यशस्वी विद्यार्थिनींनी सांगितले. सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थनींचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these

X