स्व . विलासराव तांबे यांच्या कार्याचा वसा कुटुंबियांनी जपला

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी व शिवनेरीभूषण पुरस्कार विजेते स्व. विलासराव तांबे सर यांच्या शैक्षणिक सामाजिक , राजकीय व अध्यात्मिक कार्याचा वसा त्यांच्या कुटुंबियांनी जपला आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व जुन्नर तालुका भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी केले.

स्व. विलासराव तांबे यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार वितरण समारंभामध्ये सौ बुचके बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील जेष्ठ पत्रकार नरेंद्र जयराम डुंबरे हे होते. कार्यक्रमासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष संतोषनाना खैरे उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे, ओतूरच्या ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे संस्थेचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशालशेठ विलासराव तांबे, उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, मानद सचिव वैभवशेठ तांबे, विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे, श्रीमती निलम तांबे, बाजार समितीचे संचालक तुषार
थोरात, ओतूरचे प्रभारी सरपंच प्रशांत डुंबरे, मोहित ढमाले, गंगारामबुवा डुंबरे, ग्रीन व्हिजनचे शिरीष दुंबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी स्व. विलासराव तांबे सर व श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष विशालशेठ तांबे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. तसेच ज्यांना ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे अशा मान्यवरांच्या कार्याची माहिती त्यांनी दिली.

आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी जुन्नर तालुक्यात ज्ञानगंगा आणण्याचे काम स्व. विलासराव तांबे यांनी केले. जेष्ठ नेते शरद पवार यांचा स्व. तांबे सरांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात होता. सरस्वती आल्यानंतर लक्ष्मीची पावले आपोआपच येतात असे सांगून सौ बुचके म्हणाल्या, स्व. तांबे सरांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव विशाल, वैभव व पत्नी श्रीमती निलमताई है हा शैक्षणिक वटवृक्ष अधिक मोठा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी निश्चित करेल असे आश्वासनदेखील सौ बुचके यांनी यावेळी दिले.

संस्थेच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणारे जेष्ठ वास्तू विशारद अरविंद ब्रम्हे बाळासाहेब हरकु डुंबरे व कै. दा. ना. पाटील डुंबरे (मरणोत्तर) यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे होते. कै. दा. ना. पाटील डुंबरे यांना देण्यात आलेला मरणोत्तर पुरस्कार त्यांचे सुपुत्र जयप्रकाश डुंबरे व कुटुंबियांनी स्वीकारला. यावेळी डॉ अमोल डुंबरे, अँड जयदीप डुंबरे यांच्यासह सर्व कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या डूडळगाव (आळंदी) येथील राजा शिवछत्रपती विद्यालयात नववीमध्ये शिकणारा विदयार्थी कु. मल्हार पंकज भागवत याने खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच ओतूर येथील अँड वृषाली अजित मोरे यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड झाल्याबद्दल या दोघांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी यांचे नोव्हेल रिसर्च या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले .
ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांनी पुरस्काराला उत्तर देताना स्व. विलासराव तांबे यांच्या समवेत केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिक काम करण्यासाठी स्व. विलासराव तांबे सर व स्व. दा.ना. पाटील डुंबरे यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले असे सांगून अध्यक्षस्थानावरून बोलताना नरेंद्र डुंबरे म्हणाले, स्व. विलासराव तांबे सर यांनी ओतूर व परिसरात शिक्षण क्षेत्राच्या विविध शाखा निर्माण केल्याने ओतूरचा ( जी.डी.पी. ) व्यापार उदीम मोठ्या प्रमाणात वाढला. कार्यक्रमासाठी बॉर्डरलेस पँथर्सचे रवि एरंडे, प्रतापराव हांडे देशमुख धनंजय लोखंडे, संजय देवकर , नितीन डुंबरे , चैतन्य पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भास्कर पोपट डुंबरे , बाबाजीशेठ डुंबरे , सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या माजी प्राचार्या मनिषा ढमाले , जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मारुती जाधव खंडू श्रीपत डुंबरे, अॅड गौरव पाटील डुंबरे, यशवंत दाते, नलिनी गुलाबराव डुंबरे, सीमा अनिलशेठ तांबे, धोंडिभाऊ मोरे, स्मिता डुंबरे, ह.भ.प. विठ्ठल महाराज शितोळे रघुनाथशेठ तांबे, शांतुअण्णा तांबे, गांधी पानसरे, बबन केशव तांबे, प्रदीप गाढवे, प्रा. बी. आर. खाडे रामदास तांबे, प्रा. संजयकुमार रहंगडाले, सचिनशेठ तांबे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रतिष्ठीत नागरिक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास तांबे कॉलेज ऑफ एज्युकेशनचे डॉ संजय देवकर तर आभार प्रदर्शन शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ गणेश दामा यांनी केले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these

X